शोध

तिच्यासाठी खुप काही लिहिलं होतं मी इथे आज त्याच्या साठी काही तरी लिहितोय ..... भेटला वेळ तर नक्की वाच......"भीती कशाची वाटते तुला नेमकी आज?? ती तुला सोडून जाईल याची..... की तु तिच्या शिवाय जगू शकणार नाहिस याची??......उदास का आहेस तु?? ती तुला भेटत नाही म्हणून की तिला तुला भेटाव वाटत नाही म्हणून??......1 सांग ......मला ?? नको स्वतः लाच ...... जर ती सोडणार च असेल तुला तर काय अर्थ धरुन ठेवण्यात या नात्याला?? ....... जर तिला तुला जाळायचच असेल तर अर्थ काय तुझ्या नेमकं जळण्याला ??....जर तिच्या गिणतीतच तु नसशील तर अर्थ काय मित्रा तिला तुझ्या आयुष्यात गृहीत धरण्याला??......माहिती आहे मला ...... आणि हो अनुभव पण चांगलाच आहे मला ...... हृदय बंद पड़तं तेव्हा डोकं येतच कुठं कामाला??...तरीही जागव त्याच हृदयाला ..... मनात पेटवून "ती" नावाच्या आगीला...आणि उठ मित्रा पुन्हा एकदा नव्याने आयुष्य जगायला....घे मोकळा श्वास ......ठेव वेगळा ध्यास.....बघ उघडून डोळे.....तुझच आहे जग ....होय जगावेगळे !!....जग जगावेगळं .....बनूण जगावेगळं !!!....मी सांगत नाही जगत आहे ,बोलत नाही करत आहे.....वेळ नक्की लागेल .....कदाचित वेड सुद्धा लागेल ,ठेच सुद्धा लागेल .....लक्षात ठेव एवढंच ...........जगायचं आहे जगावेगळं .....बनायचंच आहे जगावेगळं !!"....

No comments:

Post a Comment

Google