सुरवात नववर्षाची

जुनं वर्ष सरताना मनात अनामिक हुरहुर दाटून येते शेवटी तेही आपलंसं झालेले असतं.
आपलं माणूस दूर जाताना हुरहुर असतेच;पण त्याचबरोबर नवं वर्ष
म्हणजेच नवी कोरी वही,३६५फुलस्केप पानांची .नव्यानं सुरवात करण्याची संधी देणारी .प्रत्येक वर्ष काहींना काही देऊन जातं.कधीही न विसारणारी माणसं ,त्याचप्रमाणे अविस्मरणीय आठवणी,सुखाच्या किंवा दुःखाच्या;काही perticular महिने
किंवा दिवस आपल्याला आयुष्यभर सोबत राहतात.
त्या दिवसांची आठवण आल  की की आपल्याला एक प्रकारचा आनंद मिळतो.
किंवा त्याप्रकारे दुःखही होत.
कॅलेंडर वरील हे अंक आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेले असतात
आपल्या जडणघडणीचा काळ यातून व्यक्त होतो.आणि जन्मल्यापासून आपण हा काळ nonstop जगत आलेलो असतो तेही वेगवेगळ्या टप्यातून.....
✍धिरज भोसले

No comments:

Post a Comment

Google